मुख्य बातमी
गुरांच्या कत्तल करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवरच हल्ला; दोघे ताब्यात
फणसवळे येथील प्रकार : ग्रामस्थ संतप्त

रत्नागिरी : तालुक्यातील मधलीवाडी, फणसवळे परिसरातील जंगलात बेकायदेशीर गोवंश कत्तलीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांशी संशयितांनी हुज्जत घालत पोलिसांवरच हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रसंगावधान राखत पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, एक संशयित पसार झाला आहे.
जंगलाच्या आडोशाला सुरू असलेल्या या कथित कत्तलीची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना पाहताच संशयितांकडून विरोध करण्यात आल्याचे सांगण्यात येत असून, परिस्थिती चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती. पोलिसांनी प्रसंगावधान राखत दोनजणांना ताब्यात घेतले, तर एकजण घटनास्थळावरून फरार झाला.

