मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

सातबारा फेरफारासाठी १० हजारांची लाच स्वीकारताना चिपळूणमधील मंडळ अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई

चिपळूण : तालुक्यातील महसूल विभागातील एका मंडळ अधिकाऱ्याला सातबारा फेरफाराच्या कामासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. उमेश राजेशिर्के असे त्या अधिकाऱ्याचे नाव आहे.

तक्रारदाराच्या सातबारा उताऱ्यात फेरफार करण्याच्या कामासाठी संबंधित मंडळ अधिकाऱ्याने १० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर संबंधित पथकाने सापळा रचला. चिपळूण शहरातील पाग पॉवर हाऊस परिसरातील एका हॉटेलमध्ये तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना संबंधित मंडळ अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर त्याला ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे. महसूल विभागातील एका मंडळ अधिकाऱ्यावर झालेल्या या कारवाईची जिल्हाभरात चर्चा सुरू असून, अधिकृत तपशील समोर आल्यानंतर या प्रकरणाची संपूर्ण माहिती स्पष्ट होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!