आरोग्यमुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

उपकेंद्र कोंडसर बुद्रुक येथे जागतिक क्षयरोग दिन कार्यक्रम

राजापूर : जागतिक क्षयरोग दिनानिमित्त आज (२४ मार्च) प्राथमिक आरोग्य केंद्र धारतळे उपकेंद्र कोंडसर बुद्रुक अंतर्गत जिल्हा परिषद शाळा आडिवरे नंबर १ व ग्रामपंचायत कोंडसर बुद्रुक येथे जागतिक क्षयरोग आजाराविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी आरोग्य सेवक पी .व्ही .मूरकर यांनी क्षयरोगाविषयी माहिती दिली. क्षयरोग म्हणजे काय, त्याचे प्रकार, क्षयरोग कसा पसरतो, क्षयरोगासाठी जोखीम घटक, क्षयरोगाची लक्षणे क्षयरोगाचे निदान कसे केले जाते, शासनामार्फत मोफत उपचार औषध उपचार, क्षयरोगाचा प्रतिबंध कसा होऊ शकतो याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. नंतर क्षयरोगाची प्रतिज्ञा घेण्यात आली. यावेळी शाळेच्या शिक्षिका सौ. वृषाली विश्वासरा, सौ. नंदा साबळे, अंगणवाडी सेविका श्रीमती मधुरा लिंगायत, मदतनीस आदिती नांदगावकर यांच्यासह विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

त्यानंतर ग्रामपंचायत कोंडसर बुद्रुक येथेही जनजागृती करण्यात आली. यावेळी कोंडसर बुद्रुकचे उपसरपंच प्रमोद वारीक, ग्रामपंचायत अधिकारी अनिल पिटलेकर, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा स्वयंसेविका श्रीम.प्रांजल नांदगावकर, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!