मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

आमदार भास्कर जाधव यांच्याकडून पेठमाप येथील शेवगा शेतीची पाहणी

चिपळूण (संदेश कदम) : तालुक्यातील पेठमाप येथे शेतकरी इम्तियाज मुकादम यांनी ३० गुंठे क्षेत्रात लावलेल्या ७०० शेवगा (moringa, शेहजन, शेगुळ) झाडांची लागवडी केली असून, या बागायतीची पाहणी नुकतीच शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव यांनी केली.

आमदार जाधव हे स्वतः शेतकरी, शेतीतले जाणकार असल्यामुळे शेवग्यासाठी लागणाऱ्या खतव्यवस्थापनाचे मार्गदर्शन केले. येणाऱ्या अडचणींची, वानर, माकड यांपासून होणाऱ्या उपद्रवाची माहिती दिली व मार्गदर्शन केले. तसेच महाराष्ट्र शासनाने प्रत्येक वानर पकडण्यासाठी रुपये सहाशे मानधन जनतेसाठी ठेवले आहे त्याचीही सविस्तर माहिती दिली.

कोकणात भरपूर पाऊस पडत असताना शेवगा शेती हा नवीन प्रयोग केलेला आहे, तो प्रयोग यशस्वी करा आणि त्याची माहिती सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासंदर्भातही मार्गदर्शन केले आणि शुभेच्छा दिल्या.

यावेळी आमदार जाधव यांच्यासोबत नगरसेवक फैसल कासकर, नगरसेवक मिथिलेश (विकी) नरळकर, जफर कटमाले उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!