मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

रोहन रसाळेची १४ वर्षांखालील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघामध्ये निवड

आबलोली (संदेश कदम) : येथील एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूलमधील इयत्ता सातवीमध्ये शिकत असलेला रोहन महेश रसाळे याची १४ वर्षांखालील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या संघामध्ये निवड झाली आहे. ही स्पर्धा ८ ते ११ सप्टेंबर दरम्यान गोवा येथे होणार आहे.

तसेच याच शाळेत इयत्ता इयत्ता आठवीमध्ये शिकत असलेला श्रीश स्वप्नील सुर्वे याची नागपूर येथे झालेल्या १४ वर्षांखालील राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्याच्या क्रिकेट संघामध्ये मध्ये निवड झाली आहे. याबद्दल या दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, हे दोन्ही विद्यार्थी डॉ. योगिता खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली खेळत आहेत.

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सचिन चंद्रकांत बाईत, सेक्रेटरी सौ. स्नेहल सचिन बाईत यांनी या दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच आबलोलीतील उद्योजक शुभम सचिन बाईत यांनी विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव केला. यावेळी मुख्याध्यापिका सौ. नेत्रा नरेंद्र रहाटे व सर्व शिक्षक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!