मुख्य बातमी

विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग २०२७ क्विझ; युवकांनी सहभागी होण्याचे जिल्हा युवा अधिकाऱ्यांचे आवाहन

रत्नागिरी : राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेत युवकांचा सक्रिय सहभाग वाढावा आणि त्यांच्या नेतृत्वगुणांना वाव मिळावा, या उद्देशाने ‘विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग २०२७ क्विझ’चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी सम्राट पाटील यांनी केले आहे.

हा उपक्रम देशातील युवा पिढीला आपले ज्ञान, सर्जनशीलता, विचार आणि क्षमता प्रदर्शित करण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून देतो. विकसित भारताच्या उभारणीत तरुणांची भूमिका निर्णायक ठरणार असून, हा उपक्रम त्यांना थेट राष्ट्रनिर्मितीच्या प्रक्रियेशी जोडणारा दुवा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातील युवक-युवतींनी स्वतः सहभागी होण्यासोबतच इतर सहकाऱ्यांनाही यासाठी प्रोत्साहित करावे, असेही त्यांनी नमूद केले.

सहभागाची अंतिम मुदत २० सप्टेंबर असून, नोंदणी mybharat.gov.in/vbyld-2027 या संकेतस्थळावर करायची आहे. इच्छुक व पात्र युवकांनी मुदतीपूर्वी अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन आपली नोंदणी पूर्ण करावी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!