भाजपा सरचिटणीस निलेश आखाडे यांच्या वतीने घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन

रत्नागिरी : गणेशोत्सव हा कोकणात केवळ सण नसून, एक भावनिक सोहळा असतो. आपल्या लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी प्रत्येक घरात मनमोहक आणि कल्पक सजावट केली जाते. याच सजावटीला अधिक प्रोत्साहन आणि रंगत यावी, यासाठी भारतीय जनता पार्टी रत्नागिरी शहर सरचिटणीस निलेश महादेव आखाडे यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सव सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सध्या प्रत्येक घरात गणेश सजावटीची लगबग सुरू आहे. अनेकांनी पर्यावरणपूरक, किल्ले, कोकणी वाडा, पौराणिक देखावे अशा विविध थीमवर आकर्षक सजावट साकारली जात आहे. या कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि स्पर्धेच्या माध्यमातून बाप्पाच्या सजावटीत आणखी उत्साह निर्माण व्हावा, हा या स्पर्धेमागचा मुख्य हेतू असल्याचे आयोजक निलेश आखाडे यांनी सांगितले.
इच्छुक स्पर्धकांनी आपल्या घरातील बाप्पाच्या सजावटीचे वेगवेगळ्या चार बाजूंनी चार छायाचित्रे आणि एक मिनिटाचा व्हिडीओ (रील) तयार करून 9860625740 या व्हॉट्सॲप क्रमांकावर आपले संपूर्ण नाव, पत्ता व मोबाईल नंबरसह पाठवायचा आहे. ही स्पर्धा केवळ प्रभाग क्र. ६ व ७ साठी मर्यादित असून, फोटो पाठवण्याची अंतिम मुदत १४ ते १७ सप्टेंबरपर्यंत आहे. स्पर्धेत क्रमांक मिळवणाऱ्या विजेत्यांना रोख पारितोषिके व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. कोकणच्या या वैभवशाली गणेशोत्सवात आपल्या सजावटीच्या कलेला दाद मिळवण्यासाठी जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपा शहर सरचिटणीस निलेश आखाडे यांनी केले आहे.



