मेर्वी येथे भक्तिमय वातावरणात गणरायाचे आगमन; कोकणात सर्वत्र चैतन्यदायी वातावरण

गावखडी : बाप्पा मोरयाचा जयघोष… ढोल ताशांचा निनाद… फुलांनी सजवलेल्या माळा. आणि गणेश भक्तीचे उत्साहित चेहरे अशा भक्तिमय वातावरणात गणेश चतुर्थी पूर्वीच गणेशभक्तांनी रविवारी आपल्या लाडक्या बापाला घरी नेणे पसंत केले आहे.
गणेश चतुर्थीच्या दिवशी होणारी धावपळ टाळण्यासाठी आणि पावसाचे विघ्न टाळण्यासाठी अनेक गणेश भक्तांनी रविवारी अगदी वाजत गाजत रत्नागिरी तालुक्यातील मेर्वी गावात बाप्पाची मूर्ती घरी आणली. गणरायाच्या पूजेच्या तयारीसाठी लागणारे साहित्य सजावटीचे साहित्य खरेदीसाठी रत्नागिरी बाजारपेठ फुलल्या आहेत. पूजेसाठी लागणारी तसेच सजावटीसाठी फुले, केवड्यांची पाने, कमळ, दुर्वा, शमी पत्रे, फुलपत्री यांना मागणी वाढत आहे. प्रसादासाठी पेढे, मोदक, यांचीही खरेदी चालू सुरू असून, बाजारात मोठ्या प्रमाणावर उलाढाल बाजारात सुरू आहे.
गणरायाच्या आगमनाची लगबग रविवारी बाजारपेठेत तसेच मेर्वीसारख्या ग्रामीण भागात घरोघरी गणरायाची लगबग दिसून येत आहे.
(छाया : दिनेश पेटकर, गावखडी)



