मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

निसर्ग वाचवा… शेती वाचवा… कातळसडे वाचवा… पर्यावरण परिसंस्था वाचवा…

गणपतीच्या देखाव्यातून सत्यवान दर्देकर यांनी दिला संदेश

आबलोली (संदेश कदम) : “त्वं भूमिरापो नलोनिलो नभः हे गणेशा तूच पृथ्वी, पाणी, अग्नी, वायु आणि आकाश आहेस म्हणजेच संपूर्ण निसर्ग निर्माण करणारी ही पंचमहाभूते म्हणजेच ईश्वर आहे. निसर्गाचे रक्षण करणे हीच ईश्वराची पूजा आहे. मानवाच्या कोट्यावधी वर्ष आधीपासून पृथ्वीवर परिसंस्था म्हणजेच इकोसिस्टीम अस्तित्वात होती. थोडक्यात सांगायचे झाले तर मानव परिसंस्थेचा निर्माता नसून तो परिसंस्थेचा एक भाग आहे. मानवाच्या अती हस्तक्षेपामुळे परिसंस्था अत्यंत वेगाने बिघडू लागले आहे. ज्यामुळे नैसर्गिक समतोल बिघडला आहे त्यातील एक भाग म्हणजे कातळसडे वरून कोरडे आणि खडबडीत दिसणारे कातळसडे निसर्गाच्या दृष्टीने प्रचंड महत्त्वाचे आहेत. जलसंधारण जिवंत झरे जैवविविधता हंगामी रानफुले, प्राणी व किटकांचा अधिवास थोडक्यात सांगायचे झाले तर कातळसडे ही केवळ थोडी किंवा उसळ जमीन नसून तो एक कोकणचा पाण्याचा मुख्य स्त्रोत आणि निसर्गाचा अनमोल खजिना आहे. म्हणूनच या कातळसाड्यांचे रक्षण करणे, अत्यंत गरजेचे बनलेले आहे म्हणूनच निसर्ग वाचवा.., शेती वाचवा.. कातळसडे वाचवा.. पर्यावरण परिसंस्था वाचवा, ” असा मौलिक संदेश गणेशोत्सव आकर्षक देखाव्याद्वारे गुहागर तालुक्यातील परचुरी येथील सत्यवान दर्देकर यांनी दिला आहे.

ते म्हणाले की, “सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये पसरलेली जंगली निसर्गाचे एक अनोखे वरदान आहे. हवामान नियंत्रण पर्जन्यवृष्टी जलसंधारण नद्यांचे उगमस्थान औषधी वनस्पती वन्यजीव आणि जैवविविधता अशा जंगलांचे संवर्धनाने संरक्षण करणे ही सुद्धा अत्यंत महत्त्वाच्या आणि वैशिष्ट्यपूर्ण परिसंस्था आहेत. गवताळ जागा (ग्रासलँड) वरवर पाहता उन्हाळ्यात कोरडे आणि ओसाड वाटते; पण पावसाळ्यात मात्र हे कातळसडे हिरवेगार होतात. विहिरीचे पुनरुज्जीवन, अद्वितीय जैवविविधता, पशुधनासाठी चारा अशा वैशिष्ट्यपूर्ण या परिसंस्थेला सध्या मोठा धोका निर्माण झाला आहे. याचे रक्षण करणे सुद्धा महत्त्वाचे आहे. शेती ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आणि संस्कृतीचा कणा आहे. कारण हे केवळ अन्न मिळवून देणारे माध्यम नसून मानवी जीवनाचा आणि पर्यावरणाचा मुख्य पाया आहे. आर्थिक स्थौर्य, अन्न सुरक्षा, संस्कृती आणि परंपरा मोठ्या प्रमाणात रोजगार पर्यावरण संतुलन यासाठी शेती करणे खूप महत्त्वाचे आहे.”

अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, “गणपती बाप्पाची मूर्ती शाडूच्या मातीपासून साच्याशिवाय हाताने बनवलेली आहे. त्यामध्ये वापरले गेलेले सर्व साहित्य पर्यावरण पूरक आहे. गणपती बाप्पाचा मुकुट नारळाची करवंटी, सुपारी, तुळशीचे मनी, चिरफळे या साहित्य पासून बनवलेला आहे. यामध्ये गणपती बाप्पाच्या एका हातात पृथ्वी, एका हातात “वसुधैव कुटुम्बकम” असा संदेश देणारे पुस्तक, एका हातामध्ये मोदक आणि एक भक्ताला शक्ती देणारा आशीर्वादाचा हात. यातूनच आमच्या शरीरातील मुलाचार चक्रामध्ये वास करतोयस त्यातला काही अंश जरी आमच्यामध्ये जागृत झाला तर या पर्यावरण परिसंस्थेला गत वैभव पुन्हा एकदा प्राप्त होईल,” अशी अपेक्षा यावेळी सत्यवान दर्देकर यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!