‘डाक अदालत’मधून होणार नागरिकांच्या तक्रारींचे निवारण

रत्नागिरी : डाक विभागाच्या वतीने रत्नागिरी विभागातील टपाल ग्राहकांच्या प्रलंबित व समाधान न झालेल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी विभागीय स्तरावरील ‘डाक अदालत’चे आयोजन ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता अधीक्षक डाकघर, विभागीय कार्यालय, गोगटे जोगळेकर कॉलेज शेजारी, रत्नागिरी ४१५६१२ येथे करण्यात आले आहे.
या डाक अदालतमध्ये प्रामुख्याने ज्या नागरिकांच्या तक्रारींचे अद्याप निराकरण झालेले नाही किंवा समाधानकारक उत्तर मिळालेले नाही, अशा प्रकरणांवर सुनावणी घेतली जाईल. यामध्ये खालील सेवांचा समावेश आहे: टपाल व स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा व डाक वस्तू / पार्सल, पोस्टल बचत बँक, मनीऑर्डर बाबतच्या तक्रारी.
तक्रारदारांनी आपली तक्रार सर्व पुराव्यांसह आणि तपशीलात लिहून पाठवणे आवश्यक आहे. एका व्यक्तीने केवळ एकच तक्रार अर्ज करावा.
तक्रार मा. अधीक्षक डाकघर, विभागीय कार्यालय, रत्नागिरी – ४१५६१२ यांच्या नावे ३० सप्टेंबर किंवा त्यापूर्वी संबंधित कार्यालयात पोहोचणे बंधनकारक आहे. मुदतीनंतर येणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाही., असे डाक विभागामार्फत कळविण्यात आले आहे.


