मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

गुहागरमध्ये वीज ग्राहकांसाठी “सेवा सेतू” आणि “सेवा संकल्प” अभियानाला उत्साहात प्रारंभ

आबलोली (संदेश कदम) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक व घटनात्मक पदावरील कार्यकाळास २५ वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य साधून महावितरणकडून वीज ग्राहकांना अधिक वेगवान आणि सुलभ सेवा देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात विशेष सेवा कक्ष उभारण्यात आला आहे. १७ ऑक्टोबरपर्यंत “सेवा सेतू” आणि “सेवा संकल्प” अभियान राबवण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून गुहागरमध्ये गुहागर आगार येथे आजपासून महावितरणने या संकल्प अभियानाला उत्साहात प्रारंभ केला आहे. या अभियानामुळे ग्राहकांसाठी महिना १०० युनिटपर्यंत प्रधानमंत्री सूर्या घर मोफत वीज योजनेसोबत राज्य सरकारची स्मार्ट योजना अधिक लाभदायक ठरणार आहे

या अभियानाचा प्रारंभ गुहागरचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वप्नील चव्हाण, उपकार्यकारी अभियंता सुनील सूद, तळवळीचे कनिष्ठ अभियंता ऑल्विन फर्नांडिस, गुहागरचे सहाय्यक अभियंता ऋषिकेश शेट्ये, शृंगारतळीचे सहाय्यक अभियंता बापू सोनवणे, गुहागरच्या सहाय्यक अभियंता सौ. काजल नायक, गुहागरचे आगर प्रमुख स्वप्नील शिंदे, विद्युत ग्राहक संघटनेचे गुहागर तालुकाध्यक्ष पराग कांबळे, सावर्डेचे (सोलर) इंडोवेट एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे मंदार शेंबेकर, आबलोलीचे कनिष्ठ अभियंता सुजय निकम, गुहागरचे उच्चस्तरीय लिपिक महेश डिंगणकर या मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.

याप्रसंगी विद्युत ग्राहक संघटनेचे गुहागर तालुकाध्यक्ष पराग कांबळे यांनी मार्गदर्शन करताना या अभियानाचा गुहागर तालुक्यातील १२२ गावांना लाभ होणार असल्याचे नमूद करत या अभियानाला आमचा कायम पाठिंबा राहील, असे आश्वासन दिले आणि सर्वांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!