कुवारबाव (रत्नागिरी) येथे २८ सप्टेंबरला सेवा संकल्प अभियानातंर्गत शिबिर
विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आणि ‘सेवा परमोधर्म’ या उक्तीप्रमाणे सामान्य नागरिकांपर्यंत शासकीय सेवा पोहोचविण्याच्या उद्देशाने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत राज्यात ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत रत्नागिरी तालुक्यात २८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता ग्रामपंचायत कुवारबाव सभागृह, उत्कर्ष नगर, कुवारबाव, रत्नागिरी येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये नागरिकांच्या सोयीसाठी एकाच छताखाली विविध शासकीय विभागांच्या सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
यामध्ये प्रलंबित फेरफार नोंदीचा निपटारा करणे, जिवंत ७/१२ मोहीम, गावठाणातील नागरिकांना स्वामित्व सनद वाटप, पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिका (रेशन कार्ड) वितरण, महसुली दाखले वाटप, मालमत्ता हस्तांतरण नोंद व कर आकारणी, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, जन्म-मृत्यू नोंद व प्रमाणपत्र, तसेच महिला बचत गटांसंदर्भातील सुविधांचा समावेश आहे.
यासोबतच, कृषी विभागामार्फत बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत सिंचन विहिरीकरिता अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी, भूमी अभिलेख विभागामार्फत जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार मोजणीशी जोडणे, आणि आधार सेवा यांसारख्या महत्त्वाच्या सुविधाही नागरिकांना मिळणार आहेत.
रत्नागिरी तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी के
ले आहे.


