क्रीडामुख्य बातमी

जलतरण स्पर्धेत रत्नागिरी ओपन वॉटर क्लबचा डंका

रत्नागिरी : कागल- पाझर तलाव येथे झालेल्या ओपन वॉटर स्विमिंग स्पर्धेमध्ये रत्नागिरी ओपन वॉटर क्लबच्या जलतरणपटूंनी यश मिळवले. पाचशे मीटर ते दहा किलोमीटर अशा असणाऱ्या विविध प्रकारातील स्पर्धेमध्ये स्पर्धकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. राज्य व देशाच्या बाहेरूनही स्पर्धक मोठ्या प्रमाणात या स्पर्धेसाठी आले होते.

रत्नागिरी ओपन वॉटर क्लबमधून पाच किलोमीटरमध्ये विशाल भोसले यांनी फक्त एक तास ४८ मिनिटात पूर्ण करून प्रथम क्रमांक मिळवला. दोन किलोमीटर गटात विवेक विलणकर यांनी फक्त ३२ मिनिटात पूर्ण करून प्रथम क्रमांक मिळवला. दोन किलोमीटरमध्ये १६ ते २९ वयोगटात यश देवदास यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. दोन किमीमध्ये १६ ते २९ गटात राज राऊत यांनी तिसरा क्रमांक मिळवला. तीन किलोमीटर गटामध्ये रुद्र शेटे द्वितीय क्रमांक मिळवला. तीन किमी गटामध्ये श्रीयांश वाघाटे तिसरा क्रमांक व पाचशे मीटर मध्ये श्रीशा शिंगाडे दुसरा क्रमांक, तीन किमी रितेश नाचणकर यांनी यशस्वीरित्या पूर्ण केले.

पाचशे मीटरमध्ये यशस्वी पूर्ण करणारे वेदांत पावसकर, राज्ञी साळवी, ट्रिया विलणकर, कृष्णल गंधारे, अनाहत कुलकर्णी, क्रिशा गंधारे, श्लोक राय या सर्वांना प्रशिक्षक विवेक विलणकर यांचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!