मुख्य बातमी

रत्नागिरीत उद्या ‘१०० तास खगोलाचे’ उपक्रमांतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन

दुर्बिणीतून सूर्य व शुक्र दर्शन घेण्याची संधी

रत्नागिरी : आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘१०० तास खगोलाचे’ (100 Hours of Astronomy) या जागतिक उपक्रमाचे औचित्य साधून रत्नागिरीत उद्या (४ ऑक्टोबर) एका विशेष खगोलविषयक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरीतील श्रीमान हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे तारांगण येथे सायंकाळी ४ ते रात्री ८ या वेळेत हा कार्यक्रम पार पडणार आहे.

‘खगोलप्रेमी, रत्नागिरी’ आणि ‘आनंदालय एक्सपिरिअन्शल होमस्कूल, रत्नागिरी’ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि रत्नागिरी नगरपालिकेच्या सहकार्याने हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा कार्यक्रम सर्वांसाठी पूर्णपणे विनामूल्य खुला ठेवण्यात आला आहे.

या उपक्रमांतर्गत सायंकाळी ४ ते ५.३० या वेळेत ‘खगोल गप्पा’ या सत्राचे आयोजन करण्यात आले असून, यात तज्ज्ञांमार्फत उपस्थितांना मार्गदर्शन केले जाईल. त्यानंतर, सायंकाळी ५.३० ते रात्री ८ वाजेपर्यंत अत्याधुनिक दुर्बिणीच्या साहाय्याने सूर्य आणि शुक्र यांचे दर्शन घेण्याची अनोखी संधी खगोलप्रेमींना मिळणार आहे.

अवकाशातील रहस्ये जाणून घेण्यासाठी आणि खगोलशास्त्राची रंजक दुनिया प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी शहरातील विद्यार्थी, पालक आणि सर्व खगोलप्रेमींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!