मुख्य बातमी

आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावर ‘बालजगत’ कार्यक्रमात बालमूर्तीकार शाल्व कारेकर याच्याशी संवाद

रत्नागिरी : प्रसार भारतीच्या आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरून दर रविवारी प्रसारित होणाऱ्या लोकप्रिय अशा ‘बालजगत’ या कार्यक्रमात रविवारी (११ ऑक्टोबर) सकाळी ९.३० वाजता विशेष मुलाखत प्रसारित केली जाणार आहे. या भागात बालमूर्तीकार शाल्व उमेशचंद्र कारेकर याच्याशी वंदना मुसळे यांनी साधलेला रंजक संवाद श्रोत्यांना ऐकायला मिळणार आहे.

कलेचा वारसा आणि बालवयातील मूर्तीकलेची साधना याविषयी शाल्व कारेकर याने या मुलाखतीमध्ये आपले अनुभव आणि कलेचा प्रवास मांडला आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे हे आहेत .

हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मध्यम लहरी ११४३ किलोहर्ट्झ (1143 Khz) आणि एफ.एम. १०१.५ मेगाहर्ट्झ (101.5 Mhz) वर प्रसारित होईल. याशिवाय ‘newsonair’ या मोबाईल ॲपवर तसेच आकाशवाणी रत्नागिरीच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर (airratnagiri) देखील हा कार्यक्रम ऐकता येईल. सर्व बालमित्रांनी आणि श्रोत्यांनी या विशेष संवादाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन आकाशवाणी रत्नागिरी केंद्रातर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!