मुख्य बातमी

रत्नागिरीत विद्यार्थ्यांसाठी मानसिक स्वास्थ्य विषयावर विशेष व्याख्यान संपन्न

रत्नागिरी : जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून आज रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन आणि इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी ‘मानसिक स्वास्थ्य’ या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. पटवर्धन हायस्कूल येथे दुपारी १ ते २ या वेळेत हा कार्यक्रम पार पडला.

आजच्या धकाधकीच्या युगात विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्याबद्दल जागरूकता निर्माण करणे, ताणतणाव समजून घेणे आणि भावनिक आरोग्याचे महत्त्व पटवून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून गोगटे जोगळेकर कॉलेजच्या मानसशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख आणि सध्या विद्यार्थ्यांना कौन्सिलिंग मार्गदर्शन करणारे प्रा. बाबर सर लाभले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना नैराश्य आणि ताणतणावाचे व्यवस्थापन करण्याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास नागरिक, पालक तसेच शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी या उपक्रमाची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून कार्यक्रमाला उत्स्फूर्त सहकार्य केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांची गरज उपस्थितांनी व्यक्त केली.

ह्या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउनचे अध्यक्ष डॉ. संदीप करे, रोटे.राजेंद्र कदम, रोटे. डॉ. केतन चौधरी, रोटे. डॉ. स्वप्ना करे आणि रोटे. अस्मिता चोप्रा तसेच इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनच्या अध्यक्ष सौ. सुवर्णा चौधरी, सौ. अशा सनगर, उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!