महाराष्ट्रमुख्य बातमी

सिनिअर्स जर्नालिस्ट असोसिएशन महाराष्ट्र रत्नागिरी जिल्हा नियुक्त्या जाहीर

धनंजय काळे अध्यक्ष, तर मेधा कोल्हटकर उपाध्यक्ष

पुणे : सिनिअर्स जर्नालिस्ट असोसिएशन, महाराष्ट्र या ज्येष्ठ पत्रकार संघटनेच्या राज्यभरातील नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. ज्येष्ठ पत्रकार धनंजय काळे यांची रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष व लेखिका आणि संवादक सौ. मेधा कोल्हटकर यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

श्री. काळे हे गेली जवळपास ३० वर्षे पत्रकारितेमध्ये काम करीत असून गेली ५ वर्ष मुक्त पत्रकार व सामाजिक क्षेत्रात काम करीत आहेत. सात्विक विचार व सात्विक लेखन हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे वैशिष्ट्य आहे. रत्नागिरी, चिपळूण, सातारा या ठिकाणी पत्रकारितेचा प्रवास झाला आहे. राजकीय, सामाजिक, साहित्य, संगीत व ज्योतिष हे त्यांच्या आवडीचे विषय आहेत.

सौ. मेधा कोल्हटकर या प्रसिद्ध लेखिका असून कोल्हापूर येथे त्यांनी पत्रकारिता व सामाजिक संघटनात्मक काम केले आहे. उद्बोधक लेखनासाठी त्यांना अनेक पुरस्कारही लाभले आहेत. संघटनेचे संस्थापक सरचिटणीस संजय जोशी यांनी राज्यस्तरावरून या नियुक्त्या संघटनेच्या अधिसूचनेद्वारे जाहीर केल्या आहेत. नवनियुक्त पदाधिकार्‍यांचे अभिनंदन केले जात आहे. कोकणातील ज्येष्ठ पत्रकार बांधवांना संघटनेचे सदस्यत्व स्विकारण्याचे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

राज्यभरात संघटनेद्वारे अशा ज्येष्ठ पत्रकार बांधवांच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर केंद्र व राज्य सरकारशी वरिष्ठ पदाधिकारी चर्चा करीत असून पत्रकार सन्मान निधी, अधिस्विकृती, आरोग्य विषयक सवलती या विषयांवर महत्त्वाचे निर्णय लवकरच घेतले जाणार असून या प्रवाहात जिल्हाभरातील कार्यरत ज्येष्ठ व निवृत्त पत्रकारांनी संपर्क साधावा असे आवाहन नवनियुक्त पदाधिकार्‍यांनी केले आहे.

ज्येष्ठ पत्रकारांचे सहकार्य घेणार

रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ज्येष्ठ पत्रकार बंधु-भगिनी असून, ज्येष्ठ संपादकानाही भेटून मार्गदर्शन व सहकार्य करण्याची विनंती आपण करणार आहोत. पहिल्या टप्प्यात सदिच्छा भेट घेऊन संघटनेचे सदस्यत्व घेण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचे श्री. काळे व सौ. कोल्हटकर यांनी सांगितले.

संघटनेचे अध्यक्ष डॉ. जयपाल पाटील, सरचिटणीस संजय जोशी व सर्व वरिष्ठ पदाधिका यांनी काम करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले आहेत. जिल्ह्यात सदस्य नोंदणी सुरू झाली असून अधिक माहितीसाठी संपर्क साधावा, असे आवाहन काळे यांनी केले आहे.

संपर्क क्रमांक – ७०८३२५९६ ४९ / ९८३४८२४०१६

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!