मुख्य बातमी

रा. भा. शिर्के प्रशालेत वाचन प्रेरणा दिन

रत्नागिरी : भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त रा. भा. शिर्के प्रशालेत वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला.

मुख्याध्यापक के. डी. कांबळे, रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या आजीव सभासद सौ. एस. डी. साखळकर, मराठी भाषा विभाग प्रमुख सौ. एस. के. कांबळे उपस्थित होते. सुरुवातीला वैष्णवी प्रभुदेसाई हिने मनोगतातून डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जीवनातील काही छोटे प्रसंग विद्यार्थ्यांना सांगितले. प्रमुख वक्ते एस. बी. पाटील यांनी डॉ. कलाम यांच्याबद्दल बोलताना त्यांचे संशोधन, नेतृत्व गुण, कष्ट करण्याची जिद्द, वाचनाची आवड या गोष्टी विद्यार्थ्यांपुढे मांडल्या आणि सर्व विद्यार्थ्यांनी नियमित वाचन करण्याची सवय अंगीकारावी असे सांगितले.

मुख्याध्यापक श्री. कांबळे यांनी शास्त्रज्ञापासून ते आपल्या देशाचे राष्ट्रपती होईपर्यंत त्यांनी मिळवलेले यश यामागे त्यांची मेहनत, जिद्द, चिकाटी, वाचन हे गुण त्यांच्याकडे असल्याचे विद्यार्थ्यांना सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!