मुख्य बातमी

जिल्ह्यात १९ नोव्हेंबरपासून तालुकास्तरावर दिव्यांग तपासणी शिबिरे

रत्नागिरी : जिल्हा सामान्य रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल), रत्नागिरी यांच्या वतीने जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी १९ नोव्हेंबर ते २२ डिसेंबर या कालावधीत तालुकास्तरावर विशेष दिव्यांग तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरांचा संबंधित परिसरातील गरजू दिव्यांगांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

तालुकानिहाय आयोजित शिबिरांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे :

* १९ नोव्हेंबर : उपजिल्हा रुग्णालय, दापोली

* २६ नोव्हेंबर : उपजिल्हा रुग्णालय, कामथे

* ३० नोव्हेंबर : ग्रामीण रुग्णालय, देवरुख

* ३ डिसेंबर : ग्रामीण रुग्णालय, लांजा

* ८ डिसेंबर : ग्रामीण रुग्णालय, मंडणगड

* १४ डिसेंबर : ग्रामीण रुग्णालय, गुहागर

* १७ डिसेंबर : ग्रामीण रुग्णालय, राजापूर

* २२ डिसेंबर : उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी

स्थानिक पातळीवरच दिव्यांगांची तपासणी होऊन त्यांना आवश्यक प्रमाणपत्र व शासकीय योजनांचे लाभ मिळणे सुलभ व्हावे, या उद्देशाने या तालुकास्तरीय शिबिरांचे नियोजन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!