मुख्य बातमी

आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावर ‘कोकण दर्शन’मधून अपरिचित स्थळांची सफर

रत्नागिरी : कोकणातील निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक वारसा आणि धार्मिक स्थळांची ओळख करून देणारा ‘कोकण दर्शन’ हा कार्यक्रम शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) सकाळी ८ वाजून ४० मिनिटांनी आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित होणार आहे.

‘सफर अपरिचित स्थळांची’ या विशेष भागामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील काही वैशिष्ट्यपूर्ण धार्मिक स्थळांची माहिती श्रोत्यांना मिळणार आहे. यामध्ये कोळीसरे येथील लक्ष्मीकशेव मंदिर, कातळवाडी येथील रामेश्वर कालिका मंदिर आणि तेवरे येथील आदित्यनाथ मंदिर या स्थळांची वैशिष्ट्ये उलगडली जाणार आहेत.

या कार्यक्रमात प्रसाद ऊर्फ बापू गवणकर, राहुल गुरव, नितीन लिमये आणि धनंजय शिंदे सहभागी झाले आहेत. लेखन सोनाली सावंत यांचे असून, निवेदन आणि निर्मिती सहाय्य सोनाली सावंत व वंदना मुसळे यांचे आहे. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे आहेत.

हा कार्यक्रम आकाशवाणीच्या ११४३ किलोहर्ट्झ मध्यमलहरी आणि १०१.५ मेगाहर्ट्झ एफएम वाहिनीवरून ऐकता येईल. तसेच NewsOnAir मोबाइल ॲपवरही कार्यक्रम ऐकण्याची सुविधा उपलब्ध आहे. प्रसारणानंतर हा कार्यक्रम AIR Ratnagiri या यूट्यूब चॅनेलवरही श्रोत्यांना ऐकता येईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!