मुख्य बातमी

कोकण रेल्वेकडून स्वच्छता जागृती यात्रेचे आयोजन

रत्नागिरी : देशभरात सुरू असलेल्या स्वच्छता अभियानांतर्गत कोकण रेल्वे कडून विविध उपक्रमाचे आयोजन केले जात आहे. कोकण रेल्वेच्या विविध स्थानके, कार्यालयांमध्ये या निमित्ताने स्वच्छता अभियान राबवले जात आहे.

विविध शाळा, महाविद्यालये, सामजिक संस्था यांचा या उपक्रमात सहभाग घेतला जात आहे. स्थानकांवर येणाऱ्या प्रवाशांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देताना लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी प्रभात फेऱ्यांचे आयोजन केले जात आहे. नुकत्याच कोकण रेल्वेच्या रत्नागिरी विभागीय कार्यालयातील कर्मचारी अधिकाऱ्यांनी स्वच्छता जनजागृती यात्रेचे आयोजन केले होते.

यात अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी या अंतर्गत लोकांमध्ये जागृती करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!