मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

भडगाव खोंडे येथील न्यू आयडियल रेसिडेन्सीमध्ये दांडिया, लेझिम आणि ‘होम मिनिस्टर’चा जल्लोष

खेड : येथील न्यू आयडियल रेसिडेन्सी, भडगाव खोंडे येथे नवरात्रौत्सवाचे औचित्य साधून रहिवाशांच्या वतीने विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले होते. यामध्ये दांडिया, पारंपरिक लेझिम नृत्य आणि महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ या विशेष खेळांचा समावेश होता.

कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक आरतीने झाली. त्यानंतर रंगीबेरंगी पोशाखात सजलेल्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच गरबा आणि दांडियाच्या तालावर ठेका धरला. यानंतर तरुणाई आणि महिलांनी सादर केलेल्या शिस्तबद्ध व ढोल-ताशांच्या गजरातील लेझिम नृत्याने संपूर्ण परिसरात एक वेगळाच उत्साह निर्माण केला.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात महिलांसाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘होम मिनिस्टर’ खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विविध मजेशीर खेळ, उखाणे आणि स्पर्धेतील चढाओढीने या कार्यक्रमात विशेष रंगत आणली. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विजेत्यांना आकर्षक पैठणी व मानाची बक्षीसे देऊन सन्मानित करण्यात आले.

हा सोहळा यशस्वी करण्यासाठी आयडियल परिवारातील सर्व कमिटी सदस्य, युवा वर्ग व महिला मंडळाच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. सर्व रहिवाशांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि सहकार्यामुळे हा नवरात्रौत्सव सोहळा मोठ्या उत्साहात व आनंदात पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!