मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

खेडमध्ये महावितरणची विशेष मोहीम; १७ नवीन कंडक्टर उभारले!

वीज यंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी दिवसभर काम; शहरातील विविध भागांत तब्बल ९ तास वीजपुरवठा बंद 

खेड : वीज ग्राहकांना अखंडित आणि सुरळीत वीजपुरवठा मिळावा, तसेच वीज यंत्रणेतील तांत्रिक अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी महावितरणच्या खेड शहर विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विशेष देखभाल मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान जुन्या कंडक्टरऐवजी नवीन १०० क्षमतेचा एलटी कंडक्टर बसविण्यासह एकूण १७ कंडक्टर उभारण्यात आले. तसेच सबस्टेशनमधील खराब झालेले दोन्ही मुख्य स्ट्रक्चर बदलण्यात आले. या कामामुळे खेड शहरातील वीज यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे.

महावितरणच्या या विशेष मोहिमेत खेड शहरातील अधिकारी श्री. जी. एन. अहमद यांच्या मार्गदर्शनाखाली लाइनमन एम. एम. राणे, कुंभार साहेब, मनीष कदम, संतोष निर्मळ, अंगदकुमार, धनश्री कांदे, मेघा इंगावले, अतिश हरेकर, दीपेंद्र जाधव, ओंकार शिंदे, राहुल कावणकर, ऋतिक लाड आणि दीपक नागरगोजे यांच्यासह इतर लाइनस्टाफ व जनमित्रांनी सक्रिय सहभाग घेतला.

या मोहिमेत वीज वाहिन्यांची दुरुस्ती, जुना कंडक्टर काढून नवीन १०० क्षमतेचा एलटी कंडक्टर बसविणे आणि एकूण १७ कंडक्टर उभारण्याची कामे करण्यात आली. याशिवाय सबस्टेशनमधील खराब झालेले दोन्ही मुख्य स्ट्रक्चर बदलण्यात आले. पावसाळा, उन्हाळा तसेच दैनंदिन देखभालीदरम्यान वीजपुरवठ्यात तांत्रिक अडथळे निर्माण होऊ नयेत आणि ग्राहकांना अधिक चांगली सेवा देता यावी, हा या मोहिमेमागील उद्देश होता.

महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिवसभर मेहनत घेत वीज यंत्रणेच्या देखभालीची कामे पूर्ण केली. मात्र, या कामासाठी वीजपुरवठा बंद ठेवावा लागल्याने विजेवर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांसह नागरिकांची गैरसोय झाली. काही व्यवसायांवर त्याचा आर्थिक परिणाम झाल्याची शक्यता असून, वीजपुरवठा बंद असताना नागरिकांनी पर्यायी व्यवस्था करण्याची गरज अधोरेखित झाली.

महावितरणकडून देण्यात आलेल्या सूचनेनुसार, सोमवार, दि. २६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत खेड शहर आणि परिसरातील विविध भागांचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला होता.

शहरातील समर्थ नगर, पावसकर नाका, शिवाजीनगर, साठे मोहल्ला, तीनबत्ती नाका, गुजर आळी, वाणी पेठ, एकवीरा नगर, कासार आळी, मदिना चौक, कातळ आळी, तळ्याचे वाकण, ब्राह्मण आळी, पोत्रिक मोहल्ला, साळीवाडा, कुंभारवाडा, तांबे मोहल्ला, कुवारसाई, पटेल कौचाली मोहल्ला, डाकबंगला, एस.टी. डेपो, महाड नाका, भरणे नाका, मच्छी मार्केट, वेरळ, बाजारपेठ, सुकीवली, बंदर नाका, स्वरूप नगर, कुडोशी आणि सोनार आळी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!