जानवळे वाणेवाडी नं. २ गणपती विसर्जन घाट (दाऱ्यात) येथे बांधणार मनसे वनराई बंधारा
मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांचा पुढाकार

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील जानवळे वाणेवाडी नं.२ गणपती विसर्जन घाट (दाऱ्यात) येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांच्या माध्यमातून २ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १ वाजता या वेळेत मनसे वनराई बंधारा बांधण्यात येणार आहे. वनराई बंधारा बांधण्यासाठी गुहागर विधानसभा मतदारसंघातील मनसेचे सर्व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
बंधारा बांधण्यासाठी मनसे जिल्हा संघटक मनिष पाथरे, जिल्हा सचिव सचिन गायकवाड, चिपळूण व गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी, वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष राजेंद्र उर्फ राजू खेतले, गुहागर तालुका अध्यक्ष सुनील हळदणकर तसेच संघटनेचे पदाधिकारी, तसेच शहर, उपतालुका, विभाग अध्यक्ष, उपविभाग अध्यक्ष, शाखा अध्यक्ष, उपशाखा अध्यक्ष, गट अध्यक्ष बुथ अध्यक्ष तसेच महाराष्ट्र सैनिक उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आजी माजी पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक आणि ग्रामस्थांनी यावेळी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मनसेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, शेतकरी संघटना गुहागर तालुका अध्यक्ष प्रसाद कुष्टे, विद्यार्थी सेना गुहागर तालुका अध्यक्ष प्रथमेश रायकर, शृंगारतळी शहराध्यक्ष वेदांत देवळेकर, गुहागर शहराध्यक्ष अभिजीत रायकर, सांस्कृतिक विभाग अध्यक्ष राहुल जाधव, प्रसार माध्यम दीपक जोशी, प्रसिद्ध माध्यम प्रीतम सुर्वे यांनी केले आहे.



