रत्नागिरी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन आयोजित राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धा उत्साहात; १३ खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

रत्नागिरी : जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन आयोजित राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेत जिल्ह्यातील १७२ खेळाडूंनी सहभाग नोंदविला. या स्पर्धा एसव्हीजेसीटी स्पोर्ट अकॅडमी, डेरवण येथे आयोजित करण्यात आल्या होत्या.
या स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या १३ खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. NIDJAM राष्ट्रीय स्पर्धा हैदराबाद, तेलंगणा येथे १४ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत होणार आहेत. छोट्या गटातील या खेळाडूंना थेट राष्ट्रीय स्पर्धेत खेळण्याचा अनुभव या स्पर्धेच्या निमित्ताने मिळणार आहे.
या स्पर्धेचे आयोजन संघटनेचे अध्यक्ष बाळासाहेब कदम, उपाध्यक्ष श्रीकांत पराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सैफन चरके, अविनाश पवार, शिवा माळी, सचिव संदीप तावडे यांनी विशेष परिश्रम घेतले. खेलो इंडिया प्रशिक्षक अविनाश पवार यांनी स्पर्धेतील विजेत्या खेलाडूमधून सर्वोत्कृष्ट अशा १३ खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड केली. स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकाच्या खेळाडूना पदक व प्रमाणपत्र देवून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौराव्विण्यात आले.
स्पर्धेचा निकाल- ट्रायथलोन अ- यश शिगवण, सार्थक सुतार, निदिश वारे. मुली- अनुष्का राणे, आरोही शिर्के, स्वराली गोवळकर.
ट्रायथलोन ब- दक्ष हातिसकर, शिवं पांचाळ, तहा कोतवडेकर. मुली- आर्या भुवड, तनिशा मुनघ गार्गी भुवड. ट्रायथलोन सी- आदित्य गजमल, अर्णव चोरगे, सार्थक वीर. मुली- सौम्या सरफरे, संस्कृती घुमे, सान्वी गोताड. ६० मी. धावणे- वेदांग चितळकर, रोमित जाधव, पार्थ मोरे. मुली- वेदिका जगदाळे, सान्वी चव्हाण, स्वरा उपशेटे. ६०० मी. धावणे- वेदांत पाटील, आर्यन मेस्त्री, राज कदम. मुली- चिन्मयी शिगवण, इच्छा राजभर, स्वरा उपशेटे.
८० मी. हर्डल्स- आदित्य पातेरे, वेदांग चितळकर, मंथन दुडे. मुली- अस्मिता पळसमकर, इच्छा भिंगे, श्रेया बने. लांब उडी- मंथन वारे, सोहम आंबेडे, समर्थ नांदलस्कर. मुली- वेदिका जगदाळे, क्रांती कांबळे, आसावी मोरे. उंच उडी- आदित्य पातेरे, सोहम कुळ्ये, मोहम्मद अन्सारी. मुली- सा न्वी चव्हाण, आर्या जाधव, निधी शिगवण. गोळा फेक- नूर अन्सारी, साज जाधव, राज कदम. मुली- दानिया जुवाले, शर्वरी कदम, संस्कृती मानकर. भला फेक- नूर अन्सारी, असद शहा, अब्दुल शीख. मुली- अंतरा चव्हाण, शमिका पवार, दानिया जुवाले. पेन्टाथलान- सार्थक धामणे, स्वराज गुरव. मुली- वेदिका यादव.


