संगमेश्वर नावाडी येथे रत्नागिरी जिल्हा रोहिदास समाजाची मासिक सभा उत्साहात संपन्न
नवनिर्वाचित कार्यकारिणीचा सत्कार सोहळाही उत्साहात संपन्न

आबलोली (संदेश कदम) : रत्नागिरी जिल्हा रोहिदास समाज सेवा संघाची मासिक सभा नुकतीच संगमेश्वर नावाडी येथे उत्साहात संपन्न झाली. यात २०२६ ते २०३० या पाच वर्षांसाठी निवड करण्यात आलेल्या अध्यक्ष व पदाधिकारी यांचा मान्यवरांचे हस्ते सत्कार सोहळा उत्साहात झाला.
प्रारंभी अध्यक्ष सुरेश खेडकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व जगतगुरू संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर मागील सभेच्या इतिवृत्ताचे व जमा खर्चाचे वाचन करून सभेची मंजुरी घेण्यात आली. यावेळी संगमेश्वर येथे उभारल्या जाणाऱ्या रोहिदास भवनच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच रोहिदास भवनासाठी आजपर्यंत झालेल्या खर्चास मंजूरी घेण्यात आली.
या सभेमध्ये जिल्हा रोहिदास समाज सेवा संघ रत्नागिरीचे अध्यक्ष सुरेश खेडेकर यांचा सत्कार रोहिदास समाज सेवा संघ संगमेश्वर नावाडीचे अध्यक्ष मधुकर देवरुखकर यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच उपाध्यक्ष अजित आंबवकर, जिल्ह्याचे सेक्रेटरी गणेश सरणकर, जिल्ह्याचे प्रवक्ते व सहचिटणीस दीपक मेढेकर, जिल्ह्याचे खजिनदार रमेश जळगावकर, जिल्ह्याचे उपसेक्रेटरी व हिशोबतपासणीस संतोष पालशेतकर, सल्लागार रघुनाथ आडीवरेकर, खेड तालुका उपचिटणीस संजय खेडेकर, माखजनचे रोहिदास समाजाचे अध्यक्ष प्रभाकर आंबवकर, साखरपा (कोंडगाव) चे अध्यक्ष संतोष कदम, सल्लागार तथा चिपळुण अर्बन बँकेचे संचालक समिर जानवळकर, लांज्याचे दिलीप लांजेकर, चिपळूण तालुका सदस्य रवींद्र सावर्डेकर, रघुनाथ जानवळकर आणि साखरपाचे सदस्य लक्ष्मण कदम या मान्यवरांचा जाहीर आदर सत्कार सोहळा मान्यवरांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. या मासिक सभेला रोहिदास समाजातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती.


