मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

एसटीच्या दरवाजात पदर अडकल्याने महिला तोल जाऊन पडली

घोणसरे फाट्यावर अपघात : चाक पायावरून गेल्याने गंभीर जखमी, डेरवण रुग्णालयात उपचारासाठी दाखल

चिपळूण : गुहागर-चिपळूण मार्गावर घोणसरे-चिवेली फाट्यानजीक एसटी बसमधून उतरताना साडीचा पदर बसच्या दरवाजात अडकल्याने महिला तोल जाऊन खाली पडली. या यावेळी बसचे चाक तिच्या पायावरून गेल्याने या अपघातात ती गंभीर जखमी झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला गुहागर तालुक्यातील रहिवासी असून, नातेवाईकांना भेटण्यासाठी रुग्णालयात जात होती. ती सकाळी आठ वाजता गुहागर आगारातून सुटलेल्या गुहागर-रत्नागिरी एसटी बसमधून प्रवास करत होती. घोणसरे येथे बसमधून उतरत असताना हा प्रकार घडला.

अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमी महिलेला मदत केली. तिची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी डेरवण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेमुळे एसटी प्रवासातील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अपघात नेमका कोणत्या परिस्थितीत घडला, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!