कोकणमहाराष्ट्रमुख्य बातमी

घुंगुरकाठीतर्फे सिंधुदुर्गवासियांचा कसालमध्ये उद्या साहित्य सोहळा; केळुसकर, नार्वेकरांची उपस्थिती

सिंधुदुर्गनगरी : घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग सेवाभावी संस्थेतर्फे कसाल हायस्कूल येथे उद्या (१ नोव्हेंबर) रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६-३० या वेळेत सिंधुदुर्गवासियांचा साहित्य सोहळा मान्यवर आणि रसिकांच्या उपस्थितीत रंगणार आहे.

कसाल हायस्कूलच्या प्रांगणात हे दिवसभराचे पहिले घुंगुरकाठी जिल्हास्तरीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. एखाद्या सेवाभावी स्वयंसेवी संस्थेने अशा प्रकारे संपूर्णपणे जिल्हावासियांचे दिवसभराचे साहित्य संमेलन घेण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. जिल्ह्यातून तसेच अन्य ठिकाणाहूनही संमेलनाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी कवी डॉ. महेश केळुसकर, तर उद्घाटक म्हणून रंगकर्मी, लेखक श्रीनिवास नार्वेकर उपस्थित राहणार आहेत.

संमेलनात सात सत्रे आहेत. उद्घाटन सत्रानंतर मालवणी मुलखातील लोकसाहित्य यावर परिसंवाद, कथाकथन, दशावतारातील ज्येष्ठ कलाकार यशवंतकाका तेंडोलकर यांची मुलाखत, काव्यरंग हा कवितांचा नाट्याविष्कार,निमंत्रितांचे कवीसंमेलन, खुले कवीसंमेलन असे भरगच्च साहित्यिक कार्यक्रम आहेत.

संमेलनस्थळी लक्ष्मण राठीवडेकर यांचे ‘शब्दांगण’ ग्रंथप्रदर्शन, श्री. हरिहर वाटवे यांचे ग्रंथप्रदर्शन आहे. शिवाय सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लेखकांची पुस्तके उपलब्ध आहेत. साहित्यरसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संमेलनाचे मुख्य कार्यवाह सतीश लळीत, सहकार्यवाह डॉ. सई लळीत, स्वागताध्यक्ष अवधूत मालणकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!