मुख्य बातमी
रत्नागिरी शहर पोलिस ठाण्याच्या वतीने सायबर सुरक्षा डिजिटल युनिटी सेफ फ्युचर एकता दौड

रत्नागिरी : सरदार वल्लभभाई पटेल यांचे १५१ व्या जयंतीनिमित्त सायबर सुरक्षा डिजिटल युनिटी सेफ फ्युचर एकता दौडचे आयोजन प्रभारी पोलिस अधीक्षक बी. बी. महामुनी, यांच्या मार्गदर्शनाखाली आज (३१ ऑक्टोबर) करण्यात आले.
रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या वतीने ही दौड रत्नागिरी शहर पोलीस ठाणे ते भाट्ये समुद्रकिनारा अशी काढण्यात आली. त्यामध्ये सायबर सुरक्षा बॅनर्स तसेच घोषणा देऊन जनजागृती करण्यात आलेली आहे. या एकता दौडमध्ये रत्नागिरी शहर पोलीस ठाणे, पोलीस मुख्यालय आरसीपी जवान, सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी अंमलदार सहभागी झालेले होते.



