आंतरमहाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धेत रिया मयेकरला सुवर्णपदक

रत्नागिरी : मुंबई विद्यापीठातर्फे आयोजित आंतरमहाविद्यालयीन तायक्वांदो स्पर्धेत रिया मुकेश मयेकर हिने उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.ही स्पर्धा २५ ते २८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या गोगटे-जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आली होती .
रिया मयेकर ही खालसा कॉलेज येथे आपले पदवीचे शिक्षण घेत असून गेली ८वर्षे ती तायक्वांदो अकॅडमी राजापूर येथे मुकेश शांताराम नाचरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे. तायक्वांदो खेळातील कौशल्य, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर हे यश संपादन केले. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे खालसा कॉलेजचे प्राचार्य, क्रीडा शिक्षक, महाविद्यालयाचे प्रशिक्षक राजेश मुरव यांनी रियाचे अभिनंदन केले आहे.
या यशाबद्दल तायक्वांदो अकॅडमी राजापूरचे अध्यक्ष अभिजीत जनार्दन तेली, उपाध्यक्ष मुकेश मयेकर, खजिनदार संजय मांडवकर, सदस्य दीपक धालवलकर, संदीप राऊत, प्रसाद शिवलकर, सौ. मानसी दिवटे, सौ. दीपिका पवार, अद्वैत अभ्यंकर, निलेश रहाटे व महिला प्रशिक्षिका मधुरा नाचरे यांनी रियाचे अभिनंदन केले. तसेच तायक्वाँदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे कोषाध्यक्ष व्यंकटेश्वर कररा, सचिव सुभाष पाटील, जिल्हा उपाध्यक्ष शैलेश गायकवाड, विश्वदास लोखंडे, सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी आणि तायक्वाँदो अकॅडमी, राजापूर परिवार यांनी विशेष अभिनंदन व शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेत श्रुतिका विजय मांडवकर व आकाश योंगेद्र बरई यांची पंच म्हणून निवड झाली होती.



