मुख्य बातमी

दापोलीत ७१ बालकांची कुपोषित म्हणून नोंद

दापोली : तालुक्यात सध्या तीव्र कुपोषित 3 तर मध्यम कुपोषित ६८ बालकांची नोंद करण्यात आली आहे. या कुपोषित बालकांसाठी लड्डू गोपाळ योजनेतर्गत सॅम-मॅम आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येत असल्याने हा आकडा दिवसेंदिवस कमी होत असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोगय अधिकारी, व उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली लड्डू गोपाळ योजनेतर्गंत बालकांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिर पार पडले. या शिबिरात डेरवण वालावलकर रूग्णालयाचे बालरोगतज्ञ डॉ. कैलाश अगरवाल यांनी बालकांची आरोग्य तपासणी केली. बालकांना पौष्टिक लाडूंचे तसेच आवश्यक टॉनिक व कॅल्शियम औषधांचे वाटप करण्यात आले.

या शिबिरासाठी ४३ बालकांनी पालकांसह उपस्थिती दर्शवली होती. यात मॅम २१ व नॉर्मल बालके २१ ते २९ बालक लाभार्थ्यांना लाडूचे वाटप करण्यात आले. ४३ बालकांवर औषधोपचार करण्यात आले. शिबिराच्या यशस्वीतेसाठी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी प्रयत्न केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!