मुख्य बातमी

पणजीत ६ नोव्हेंबर रोजी क्षेत्रीय डाक अदालत; ४ नोव्हेंबरपर्यंत तक्रारी पाठवण्याचे आवाहन

रत्नागिरी : पोस्टमास्तर जनरल, गोवा क्षेत्रीय कार्यालय (पणजी) यांच्या वतीने येत्या ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता क्षेत्रीय स्तरावरील ‘डाक अदालत’ आयोजित करण्यात आली आहे. ही अदालत गोवा क्षेत्र, पणजी येथील पोस्टमास्तर जनरल कार्यालयात पार पडणार आहे.

पोस्टाच्या दैनंदिन कामकाजाशी संबंधित ज्या तक्रारींचे सहा आठवड्यांच्या आत निराकरण झालेले नाही किंवा ज्या तक्रारींवर समाधानकारक उत्तर मिळालेले नाही, अशा प्रकरणांची दखल या डाक अदालतीमध्ये घेतली जाईल. यामध्ये प्रामुख्याने टपाल वितरण, स्पीड पोस्ट, काऊंटर सेवा, डाक वस्तू व पार्सल, टपाल बचत बँक, मनीऑर्डर यांचा समावेश आहे.

नागरिकांनी तक्रार अर्जात संपूर्ण वस्तुस्थिती आणि सविस्तर तपशील स्पष्टपणे नमूद करणे आवश्यक आहे. आपले तक्रार अर्ज ‘सहायक डाक निदेशक-१, गोवा क्षेत्रीय कार्यालय, पणजी – ४०३००१’ या पत्त्यावर ४ नोव्हेंबरपर्यंत किंवा त्यापूर्वी पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.

मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या कोणत्याही अर्जांचा या अदालतीत विचार केला जाणार नाही, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!