तलवारबाजी स्पर्धेत श्रेयसी सनगरेची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

रत्नागिरी : शालेय विभागीय तलवारबाजी स्पर्धेत पटवर्धन हायस्कूलची इयत्ता नववीतील विद्यार्थिनी श्रेयसी सनगरे हिने उल्लेखनीय कामगिरी करत फॉईल (Foil) या तलवारबाजी प्रकारात विभाग स्तरावर चौथा क्रमांक प्राप्त केला. या यशाच्या जोरावर तिची राज्यस्तरीय तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
श्रेयसीच्या या यशाबद्दल भारत शिक्षण मंडळाच्या पटवर्धन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका जानकी घाटविलकर, उपमुख्याध्यापक रूपेश पंगेरकर, पर्यवेक्षक श्री. लवंदे व श्रीमती शिरोळकर यांनी तिचे अभिनंदन केले.
तसेच क्रीडा शिक्षक श्रीपाद गुरव व श्री. साळुंखे यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन या यशासाठी लाभले. संस्थेचे कार्यवाह गणेश रायकर यांनी श्रेयसीचे विशेष अभिनंदन करून आगामी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तिला शुभेच्छा दिल्या.
श्रेयसीच्या या यशामुळे शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून तिच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


