आरोग्यमुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

आरोग्य शिबिरात महिलांना “निरोगी जीवनासाठी घ्यायची काळजी” याबाबत मार्गदर्शन

आबलोली (संदेश कदम) : मुख्यमंत्री प्रधान समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत निर्मल ग्रामपंचायत आबलोली येथे “स्वस्थ नारी, सशक्त परिवार” अभियान राबविले आहे. यात

महिलांनी निरोगी जीवन कसे जगावे याबाबत त्यांना मौलिक मार्गदर्शन करणार असल्याचे आबलोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या समुदाय आरोग्य अधिकारी नैना शेळके यांनी सांगितले.

या अभियानात महिलांची आरोग्य तपासणी करून त्यांच्यावर उपचारासंदर्भात माहिती दिली जाणार आहे. तसेच महिलांची ब्लड प्रेशर, शुगर तपासणी, रक्त तपासणी, रक्तशय व सेल स्क्रीनिंग, गरोदर मातांची तपासणी व समुपदेशन, ग्रामसेवक मासिक पाळी स्वच्छता मार्गदर्शन, गोरख आहार व आरोग्यदायी आहार पद्धती तसेच लसीकरणापासून वंचित असलेली बालके आणि गरोदर माता यांचीही तपासणी करण्यात येणार असल्याचे त्या म्हणाल्या.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!