मुख्य बातमी

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय चिपळूण व खेड तालुक्यासाठी कल्याण संघटकांचा दौरा

रत्नागिरी : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीर नारी, वीर माता, वीर पिता यांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी कल्याण संघटकांचा दौरा चिपळूण व खेड तालुक्यामध्ये ऑक्टोबर महिन्यात आयोजित करण्यात आला आहेत.

चिपळूण तालुक्यामध्ये ७ ऑक्टोबर, १४ ऑक्टोबर व २८ ऑक्टोबर रोजी सैनिकी मुलांचे वसतिगृह, चिपळूण येथे व खेड तालुक्यामध्ये ६ ऑक्टोबर, १३ ऑक्टोबर व २७ ऑक्टोबर रोजी दौरा होणार आहे.

अधिक माहितीसाठी अशा. कल्याण संघटक सुनील कदम (9413541588), कल्याण संघटक राहुल काटे (8210252830), कल्याण संघटक अनिल मोरबाळे (7218498627) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!