मुख्य बातमी

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राला श्री. सुबोध कुमार (आयएएस) यांची भेट

रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत असलेले झाडगाव येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राला श्री. सुबोधकुमार (आयएएस) यांनी आज (८ ऑक्टोबर) भेट दिली. महाराष्ट्र शासनाचे सिडकोने कोकणातील समुद्रकिनारी भागासाठी विकास प्रकल्प आयोजनासाठी ‘विशेष नियोजन अधिकारी’ म्हणून श्री. सुबोधकुमार यांची नियुक्ती केली आहे. श्री. सुबोधकुमार हे मुंबई महानगरपालिकेचे माजी आयुक्त तसेच प्रधान सचिव (वित्त), विक्रिकर आयुक्त, केंद्रीय खादी सचिव, अशी विविध पदे भूषविली आहेत.

पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये पसरलेल्या कोंकण विभागासाठी योग्य आणि शाश्वत विकास, स्थानिकांचे आर्थिक सक्षमीकरण आणि व्यापक नियोजन सुनिच्छित करणे असे त्याचे उद्दिष्ट आहे. त्याचप्रमाणे सिडको प्राधिकरणला विकास प्रकल्पासाठी व्हिजन डॉक्युमेंटला अंतिम रूप देण्यासाठी महाराष्ट्र शासनद्वारे श्री. सुबोधकुमार यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तर सल्लागार मंडळ स्थापन करण्यात आले आहे. याच उद्देशाने कोकणातील फळबागायत, मत्स्य व्यवसाय यांचा अभ्यास करण्याकरिता सदर दौरा आखण्यात आला. यावेळी त्यांचेसोबत डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय सावंत सुद्धा उपस्थित होते.

यावेळी सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र प्रमुख तसेच वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (विभाग प्रमुख) डॉ. केतन चौधरी यांनी मान्यवरांचे स्वागत केले. त्यानंतर मान्यवरांनी ‘मत्स्यालय आणि मत्स्य-संग्रहालय’ पाहणी केली. श्री. सुबोध कुमार यांनी मत्स्यालय मध्ये ठेवलेले विविध प्रकारचे मासे पहायला मिळाल्याने समाधान व्यक्त केले आणि ही मत्स्यालय पर्यटक आणि विद्यार्थी यांसाठी उत्तम पर्यटन स्थळ असल्याचे नमूद केले.

या भेटी दरम्यान सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे प्रा. डॉ. आसिफ पागरकर, अभिरक्षक डॉ. हरीश धमगाये, सहाय्यक संशोधन अधिकारी प्रा. नरेंद्र चोगले व प्रा. सचिन साटम, जीवशास्त्रज्ञ श्रीमती वर्षा सदावर्ते व श्रीमती अपूर्वा सावंत, वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक रमेश सावर्डेकर, कार्यालय अधीक्षक श्री. तांबे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!