मुख्य बातमी

रत्नागिरीतील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती उत्साहात साजरी

संस्थेतील सर्वांचा 'रोज एक तास वाचन' करण्याचा संकल्प

रत्नागिरी : भारताचे माजी राष्ट्रपती आणि मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे स्व. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती आज (१५ ऑक्टोबर) येथील शासकीय तंत्रनिकेतनच्या ग्रंथालयात उत्साहात साजरी करण्यात आली. डॉ. कलाम यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही हा दिवस “वाचन प्रेरणा दिन” म्हणून साजरा करण्यात आला.

सकाळच्या सत्रात ११ वाजता आयोजित केलेल्या कार्यक्रमाची सुरुवात डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. प्राचार्यांनी डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून त्यांना आदराने अभिवादन केले. कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा. वायकोस (अधिव्याख्याता, इंग्रजी) यांनी केली. डॉ. कलाम यांच्या प्रेरणादायी जीवनपटावर आणि वाचनाच्या महत्त्वावर प्रकाश टाकण्यात आला.

यावेळी प्राचार्यांनी डॉ. कलाम यांच्या साधेपणाचे, ज्ञाननिष्ठा आणि युवकांना दिलेल्या प्रेरणेचे महत्त्व विशद केले. तसेच, आजच्या ‘वाचन प्रेरणा दिना’च्या निमित्ताने वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले.

या प्रसंगी संस्थेतील सर्व अधिव्याख्याता, कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी एकत्रितपणे एक महत्त्वपूर्ण संकल्प केला. यापुढे रोज किमान एक तास वाचन करण्याची प्रतिज्ञा यावेळी घेण्यात आली, जेणेकरून डॉ. कलाम यांच्या विचारानुसार ज्ञानाची आणि वाचनाची परंपरा पुढे अशीच सुरू राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!