मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

आदर्श शाळा काजुर्ली नं. २ मध्ये वाचन प्रेरणा दिन, योग शिबिर, शाळा तिथे दाखला अभियान उत्साहात

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा काजुर्ली नं. २ या शाळेत डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आबलोली महा ई सेवा केंद्राचे नरेश निमुणकर व आंतरराष्ट्रीय योगपटू अनिल कालेकर उपस्थित होते.

यावेळी श्री. कालेकर यांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून सांगितले व योग शिबिर घेतले. तसेच शाळा तिथे दाखला अभियान अंतर्गत श्री. निमुनकर यांच्या हस्ते विद्यार्थी यांना वय अधिवास व राष्ट्रीयत्व दाखल्याचे वाटप करण्यात आले. नरेश निमुनकर यांनी शाळेतील मुलांना खाऊचे वाटप केले व शाळेतील कॉम्पुटर सिस्टीमसाठी कॉम्प्युटर टेबलचे वाटप केले. त्यांच्या या सहकार्याबद्दल शाळेचे मुख्याध्यापक नितीन काकडे व शिक्षकवृंद व पालक यांनी त्यांचे कौतुक केले व आभार मानले.

या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य नंदकुमार धांगडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नंदिनी मोहिते, उपाध्यक्ष ऋतुजा रेवाळे, आशाताई, माधुरी डिंगणकर, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. काजुर्ली नं. २ शाळेत खूप मोठ्या प्रमाणात शैक्षणिक उठाव होतो व या शाळेतील विद्यार्थी गुणवत्तेत ही अव्वल असतात हेच या शाळेचे विशेष वैशिष्ट्य आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!