मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन रत्नागिरी यांची वार्षिक सभा संपन्न

आबलोली (संदेश कदम) : मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशन रत्नागिरी यांची वार्षिक सर्वसाधारण सभा संगमेश्वरच्या लक्ष्मी नारायण हॉल येथे अतिशय उत्साहात पार पडली.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष महेश पंडित यांनी शून्य अपघात ही माझी जबाबदारी ही टॅग लाईन सर्वांना देण्यात आली. यासाठी सर्व स्कूल संचालकांनी या टॅग लाईन वर काम करून रत्नागिरी जिल्ह्यातील अपघात कमी करण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन करण्यात आले.

यासाठी जिल्ह्यातील सर्व स्कूल संचालक उत्स्फूर्तपणे काम करण्यासाठी तयार झाले. त्याचप्रमाणे तरुण मुलांना वाहन वेगमर्यादा कमी करण्याचे प्रबोधन स्कूल संचालकनमार्फत सर्व शाळा व कॉलेजमध्ये जाऊन करणार, असे सर्व संचालकांनी एक मुखाने ठरविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!