रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलनाच्या निमित्ताने युवकांसाठी निबंध स्पर्धा व युवा रंग काव्य स्पर्धा

रत्नागिरी : नवनिर्माण शिक्षण संस्था आणि मराठी भाषा विभाग व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीमध्ये २२ नोव्हेंबर रोजी रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलन होणार आहे. या साहित्य संमेलनामध्ये युवकांसाठी काव्यवाचन तसेच निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या वाचन आणि लेखन कौशल्याला चालना देण्यासाठी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयीन गटामध्ये निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कनिष्ठ गटामध्ये “अभिजात माय मराठी” व “मला प्रभावित केलेले मराठी पुस्तक” असे निबंधाचे विषय ठेवण्यात आले आहे . यासाठी ५०० ते ७०० शब्द मर्यादा असेल. वरिष्ठ गटामध्ये “कोकण बोलीभाषांचे माहेरघर” आणि “अभिजात मराठी आणि माझी जबाबदारी” हे दोन विषय ठेवण्यात आले आहेत. या गटांमध्ये ७०० ते १०० अशी शब्द मर्यादा असेल. विद्यार्थ्यांनी आपले नाव कॉलेजचे नाव, संपर्क क्रमांक नमूद करून आपला निबंध ५ नोव्हेंबर पर्यंत प्राचार्य, एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालय, रत्नागिरी या पत्त्यावर पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी प्रा. संदीप कांबळे (9422053372), संजय वैशंपायन (91 94224 36521) व प्रा.सचिन टेकाळे (91 94032 57581)यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा साहित्य संमेलनानिमित्त युवारंग ही काव्यवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही काव्य वाचन स्पर्धा ४ विभागात होणार आहे. “युवाशक्ती – नवभारताची कवच-कुंडलं”, “समाजातील बदल” / “संवेदना आणि संघर्ष”, “ऑपरेशन सिंधूर : गाथा अभिमानाची”,
“अभिजात भाषा मराठी: मी मराठी, मायमराठी!” या विषयावर काव्य लेखन व वाचन स्पर्धा होणार आहे.
उत्तर विभागाची (मंडणगड, खेड, दापोली) १० नोव्हेंबर रोजी वराडकर बेलोसे कॉलेज, दापोली येथे होईल. ११ नोव्हेंबर रोजी पश्चिम विभागाची (गुहागर, चिपळूण) डीबीजे कॉलेज, चिपळूण येथे स्पर्धा होईल. दक्षिण विभागाची (लांजा, राजापूर) स्पर्धा ओणी हायस्कूल, राजापूर येथे बुधवार १२ नोव्हेंबर स्पर्धा होईल. मातृ विभागाची (रत्नागिरी, संगमेश्वर) स्पर्धा नवनिर्माण महाविद्यालय, रत्नागिरी येथे १३ नोव्हेंबर येथे स्पर्धा होणार आहे.
या स्पर्धेत जिल्ह्यातील सर्व नवोदित कवी (वय मर्यादा १६ ते ३५ वर्षे) सहभागी होऊ शकतील.
स्वरचित कविता असावी. कविता मराठी भाषेतच असावी. सादरीकरणासाठी ३ मिनिटांचा वेळ दिला जाईल. कवितेची सुवाच्य अक्षरात लिहिलेली/टंकलिखित एक मूळ प्रत आयोजक व परीक्षकांना स्पर्धेआधी द्यावी लागेल. परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.
ही स्पर्धा चार विभागांत घेतली जाईल. सर्व सहभागी कवींना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रत्येक विभागातील ४ विजेत्यांना (एकूण १६ कवी) रत्नागिरी जिल्हा साहित्य संमेलन २०२५ मध्ये युवा काव्य संमेलनात कविता सादरीकरणासाठी संधी देण्यात येईल. जिल्हा साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना आकर्षक सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात येईल. या संदर्भात कवी अरुण मोर्ये (९१७५५२६६६०/८८०५७०४५५७) यांच्याकडे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

