रायपाटण येथे ७ नोव्हेंबरला वित्तीय समायोजन मेळावा

राजापूर : भारतीय डाक विभाग अंतर्गत रायपाटण ग्रामपंचायत येथे ७ नोव्हेंबरला सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळात वित्तीय समायोजन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यामध्ये पोस्ट ऑफिसमधील अनेक योजनांचा लाभ नागरिकांना एकाच ठिकाणी घेता येणार आहे.
या मेळाव्यात लहान मुलांचे आधार कार्ड काढणे व त्यांचे अपडेट करणे, इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या सर्व सुविधा, ग्रामीण डाक विमा, डाक विमा, प्रधानमंत्री किसान योजना खाती, माझी लाडकी बहिण योजना खाती, जन सुरक्षा योजना, पोस्ट ऑफिसच्या विविध योजनांची खाती, आधार कार्डवरील नाव बदलणे, पत्ता बदलणे, फोटो बदलणे, मोबाईल नंबर लिंक करणे असे आधार संबंधी सर्व प्रकारची सुविधा मिळणार आहे.
रायपाटण येथे आयोजित वित्तीय समायोजन मेळाव्याचा ग्रामस्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रायपाटणचे सरपंच नीलेश चांदे यांनी केले आहे.



