जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त १७ ऑगस्ट रोजी रत्नागिरीत “एआय” कार्यशाळा

रत्नागिरी : कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे (एआय) फोटोग्राफीचे भविष्य वेगाने बदलत आहे. या बदलत्या तंत्रज्ञानासोबत स्वतःला आणि व्यावसायिक छायाचित्रकारांना अपडेट करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर व्हिडीओग्राफर असोसिएशन वतिने जागतिक छायाचित्रण दिनाच्या औचित्याने एक दिवसीय प्रात्यक्षिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा सोमवारी (१७ ऑगस्ट) रत्नागिरी येथे सकाळी ९ ते ६ या वेळेमध्ये संपन्न होणार आहे.
यामध्ये एआय तंत्रज्ञानाचा प्रभावी आणि व्यावसायिक वापर कसा करायचा. एआयच्या माध्यमातून फोटो, व्हिडीओ एडिटिंग करणे, तसेच ॲडवर्टाइजमेंट, शॉर्ट फिल्म, सिनेमॅटिक रिल्स सोशल मीडिया प्रमोशन तसेच इंस्टाग्रावर पोस्ट, सोशल मीडिया कंटेंट, सोशल मीडिया मार्केटिंग क्रिएटिव्ह टेक्निक, एआय मदतीने फोटो व्यवसाय अधिक आधुनिक आणि फायदेशीर कसा बनवायचा याबाबत मराठीमधून प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले जाणार आहे.
या कार्यशाळेसाठी आगावू नाव नोंदणी आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्ष गुरु चौगुले (९७३०४१४४४७) यांच्याशी संपर्क साधावा व जास्तीत जास्त छायाचित्रकारांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर व्हिडीओग्राफर असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.



