मुख्य बातमी
अध्यात्म मंदिरात आज अभंग भक्तीगीत मैफिल

रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाच्या वतीने अध्यात्म मंदिर वरची आळी येथे आज (८ नोव्हेंबर) सायंकाळी ५.३० ते ७ या वेळेत स्वरगंधारच्या वतीने अभंग, भक्तीगीत मैफिल होणार आहे.
या मैफिलीत सौ. अलका बेंदरकर, गुरुदेव नांदगावकर गायन करणार आहेत. त्यांना हार्मोनियमसाथ महेश दामले, तबलासाथ हेमंत परांजपे करणार आहेत. या मैफिलचे निवेदन विनायक उर्फ राजू जोशी करणार आहेत. जास्तीत जास्त श्रोत्यांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाच्या वतीने विवेक भावे यांनी केले आहे.



