मनसेच्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त उद्या विविध कार्यक्रमांचे आयोजन

रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १९ वा वर्धापन दिन संपूर्ण राज्यात संपूर्ण जोशात साजरा केला जातो. तसाच तो रत्नागिरीही साजरा केला जाणार आहे. यानिमित्त उद्या (९ मार्च) विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्या सकाळी ९ वाजता सत्यनारायण महापूजा आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता आठवडा बाजार येथील नाकोडा कॉम्प्लेक्स येथे नूतन जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यानंतर ११.३० वाजता रत्नागिरी शहरात काम करून कुटुंब चालवाणाऱ्या कष्टकरी महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयातील मावशी, रत्नागिरी नगरपालिका स्वच्छता कर्मचारी महिला, भंगार गोळा करून कुटुंब चालवणाऱ्या महिला व भाजी विकून आपला चारितार्थ चालवणाऱ्या अशा कष्टाकरी महिलांना साडी चोळी व संसारोपोयोगी साहित्य देऊन सन्मानित केले जाणार आहे, अशी माहिती उपजिल्हाध्यक्ष अरविंद मालाडकर यांनी दिली.


