क्रीडामुख्य बातमी

राज्य तायक्वांदो स्पर्धेसाठी युवा संघ शिर्डी येथे रवाना

रत्नागिरी : तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई अहिल्यानगर तायक्वांदो असोसिएशन यांच्या वतीने आयोजित राज्य तायक्वांदो कॅडेट स्पर्धा १२ ते १५ नोव्हेंबर रोजी सिल्वर होक लोन शिर्डी वॉटर पार्क जवळ अहिल्यानगर येथे होणार आहे.

या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्हा संघ निवडण्यात आला आहे. या जिल्हा संघात रत्नागिरी तालुक्यातील युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर रत्नागिरी ओम साई मित्र मंडळ सभागृह साळवी स्टॉप तायक्वांदो प्रशिक्षण वर्गातील नुपूर दप्तरदार , संस्कृती सपकाळ, स्वरा तेरवणकर, रिद्धी धुळप, उपर्जना कररा, उत्कर्ष शेट्ये, आराध्य तहसीलदार, मंथन आंबेकर या आठ खेळाडूंची राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबईचे खजिनदार व्यंकटेश्वरराव कररा, रत्नागिरी तायक्वांदो असोसिएशनचे सचिव लक्ष्मण कररा, खजिनदार शशांक घडशी, उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, संजय सुर्वे, पदाधिकारी सौरभ चव्हाण सौ. रुही चव्हाण , तन्वी साळुंखे यांनी खेळाडूंना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले. या खेळाडूंना मार्शल आर्ट तज्ञ प्रशिक्षक राम कररा यांचे मार्गदर्शन लाभले. जिल्हा संघाचे प्रशिक्षक म्हणून सौ. शशीरेखा कररा हे काम पाहणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!