मुख्य बातमी

रत्नागिरी जिल्ह्यासाठी आलेल्या नवीन इंटरसेप्टर वाहनाचे लोकार्पण

रत्नागिरी : जिल्ह्यात वाहतूक सुरक्षेस बळकटी देणे, अपघातांचे प्रमाण कमी करणे व निरपराध लोकांचे प्राण वाचवणे तसेच वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे या उद्देशाने रत्नागिरी पोलीस दलाच्या ताफ्यात नव्या अत्याधुनिक इंटरसेप्टर वाहनाचे आज (१५ नोव्हेंबर) पोलीस मुख्यालय येथे पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

या इंटरसेप्टर वाहनाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाद्वारे निर्धारित केलेल्या सर्व वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनचालकांवर, सीट बेल्ट न लवणाऱ्यांवर (चारचाकी वाहने) व चुकीच्या दिशेने वाहन चालविणे तसेच सर्व चारचाकी व जड वाहनांकडून होणारे संबंधित वाहतूक नियमांचे उल्लंघन यावर स्वयंचलित पद्धतीने दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.

 

हे इंटरसेप्टर वाहन संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत राहणार असून राज्य महामार्गावरील वाहतूक नियमांचे काटेकोर पालन होईल याकडे विशेष लक्ष पुरविण्यात येणार आहे. या वाहनाद्वारे करण्यात येणारी दंडात्मक प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व तांत्रिक माध्यमातून स्वयंचलित राहणार आहे.

महामार्गावरील प्रवाशांची सुरक्षितता आणि वाहतूक नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी हे वाहन महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.

या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी रत्नागिरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश माईनकर, पोलीस उपअधीक्षक (मुख्या) राधिका फडके, पोलीस ठाण्याचे निरीक्षक विवेक पाटील, वाहतूक शाखेचे पोलीस नितीन भोयर तसेच मोटार परिवहन विभाग अधिकारी तसेच सर्व वाहतूक शाखेतील पोलीस अंमलदार उपस्थित होते.

रत्नागिरी जिल्ह्यातून जाणाऱ्या सर्व महामार्गावर बेफिकीर व वेगमयदिचे उल्लंघन करणाऱ्या सर्व वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे व निर्धारित वेगमयदित वाहन चालवावे आणि अपघात व कायदेशीर कारवाई टाळावी, असे आवाहन जिल्हा पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!