मुख्य बातमी

रत्नागिरीत पोलिसांचा रूट मार्च 

कर्कश आवाज करणारे सायलेन्सर जप्त

रत्नागिरी : नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना दृढ करणे या उद्देशाने रत्नागिरी पोलीस दलातर्फे रत्नागिरी शहर पोलीस ठाणे हद्दीत आज (३० नोव्हेंबर) रूट मार्च घेण्यात आला.

शहरातील राज नगर मरकज-पैजाने अत्तार मदरसा- श्रीराम चौक-कदमवाडी-कीर्ती नगर-जामा मशीद-अलिशान कॉर्नर-क्रांतीनगर ते पुन्हा राज नगर मरकस मैदान या मार्गावर हा रूट मार्च झाला. यामध्ये ५ पोलीस अधिकारी, १० पोलीस अंमलदार, १ एसआरपीएफ पथक व ७० पोलीस जवान व ६६ होमगार्ड सहभागी झाले होते.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहन तपासणी मोहीम राबविण्यात आली. या दरम्यान एका दुचाकी वाहनावर दंडात्मक कारवाई करून कर्कश आवाज करणारे सायलेंसर्स जप्त करण्यात आले. वाहन चालकाने बदल केलेले (Modified) सायलेन्सर आढळून आल्याने त्याच्यावर मोटर वाहन कायद्या अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!