मुख्य बातमी
रत्नागिरी जिल्ह्यात नगरपालिका/नगर पंचायत निवडणुकीच्या मतदानाला शांततेत सुरुवात

रत्नागिरी : जिल्ह्यातील ४ नगरपालिका आणि ३ नगर पंचायत क्षेत्रांमध्ये (रत्नागिरी शहर, चिपळूण, राजापूर, खेड, देवरुख, लांजा आणि गुहागर) आज सकाळी ७.३० वाजल्यापासून शांततेत मतदानाला सुरुवात झाली आहे. एकूण १०१ प्रभागांसाठी २०० मतदान केंद्रांवर हे मतदान पार पडत आहे. मतमोजणी उद्या (३ डिसेंबर) होणार आहे.
दरम्यान, निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने चोख बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. अद्याप कुठेही अनुचित घटना घडण्याची नोंद नाही.


