रत्नागिरी जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी

रत्नागिरी : जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपाणाच्या निवडणुकीसाठी दुपारी १.३० वाजेपर्यंतचे मतदान गुहागरमध्ये ६१.२८ तर देवरुखमध्ये ५१.७५ टक्के मतदान झाले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील नगरपालिका व नगरपंचायतमध्ये सकाळी ७.३० ते दुपारी १.३० पर्यंत झालेले मतदान असे : चिपळूण नगरपरिषद निवडणुकीसाठी पुरुष ८,३२२ तर स्त्री ८,२९३ यांनी मतदान केले. एकूण १६,६१५ मतदारांनी मतदान केले आहे. मतदानाची टक्केवारी ३९.०२ आहे. राजापूर नगरपालिका निवडणुकीसाठी स्त्री २,०३० पुरुष २०२० एकूण ४०५० मतदारांनी मतदान केले असून ४९.७४ टक्के मतदान झाले आहे. खेड नगरपालिका निवडणुकीत २,६९६ पुरुष ३०९० स्त्री एकूण मतदार ५,७८६ यांनी मतदान केले असून ४१.३४ टक्के मतदान झाले आहे.
लांजा नगरपंचायत निवडणुकीसाठी ३,५९४ पुरुष तर ३,३९५ स्त्री यांनी मतदान केले असून ६९८९ मतदारांनी मतदान केले आहे. मतदानाची टक्केवारी ४९.११ आहे.
गुहागर मतदार संघात १८६८ पुरुष १,७८५ स्त्री, ३६५३ मतदारांनी मतदान केले असून ६१.२८ मतदान झाले आहे. देवरुख नगरपंचायत निवडणुकीत २,८२३ स्त्री तर २,७६३ पुरुष असे ५,५८६ मतदारांनी मतदान केले आहे. एकूण मतदान ५१.७५ टक्के झाले आहे.



