मुख्य बातमी

हर्णै बायपास मार्गावर पर्यटकांची मिनीबस पलटी

दापोली : हर्णै बायपास परिसरात आज दुपारी १२ ते १२:३० वाजण्याच्या दरम्यान पर्यटकांची मिनीबस पलटी होऊन गंभीर अपघात झाला. पुण्यातील पिंपरी-चिंचवड येथील मिनीबसला (एमएच-१४- जीयू- १६१६) हा अपघात झाला असून बसमध्ये पाच कुटुंबे प्रवास करत होती. अचानक झालेल्या दुर्घटनेत तब्बल १० पर्यटक जखमी झाले आहेत.

प्राथमिक माहितीनुसार, पर्यटक जवळील एका हॉटेलमध्ये थांबले होते. तेथून घरी परतण्यासाठी निघताना मिनीबस रिव्हर्स घेताना चालकाचा अंदाज चुकला आणि गाडीचा तोल सुटून मिनीबस थेट रस्त्याच्या कडेला पलटी झाली. पलटी होताना बसमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आणि काही प्रवाशांना किरकोळ तर काहींना मध्यम स्वरूपाच्या दुखापती झाल्या. जखमी प्रवाशांमध्ये क्षितीज अशोक गुगणे (वय ३५), आरोही पराग गायकवाड (वय ४), पराग पर्शुराम गायकवाड (४०), नेहा पराग गायकवाड (३५), हितेश रमेश चौधरी (४०), ओजस अक्षय कुलकर्णी (५१), सुरेश साहेबराव कुचेकर, महेश दत्तात्रय वाघमारे (३९), प्राजक्ता महेश वाघमारे (३६, सर्व रा. पिंपरी-चिंचवड, पुणे) यांचा समावेश आहे.

जखमींना तातडीने उपचारासाठी आसूड येथील खाजगी रुग्णालयात तसेच दापोली उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार सर्व जखमींची प्रकृती स्थिर असून आवश्यक उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे पर्यटनस्थळी काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!